
मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अमेरिकेतील हिंदुस्थानी नागरिक साई कुमार कुर्रेमुला (31) याला 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ओक्लाहोमा येथे राहणारा साई सोशल मीडियाच्या माध्यमातून लहानग्यांचे शोषण करत असे. याला तीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. तो अनेकदा किशोरवयीन मुलगा असल्याचे भासवत लहान मुलांचा विश्वास संपादन करी.