आरोग्य विभागातून 10 हजार नोकऱ्या कमी करणार; अमेरिकेचा मोठा निर्णय

Health and Human Services Secretary Robert F Kennedy Jr.

ट्रम्प सरकार सत्तेत आल्यानंतर अमेरिकेत मोठे बदल होत आहेत. या मध्ये सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो नोकरदार वर्गाला. खर्चात कपात करण्यासाठी नोकऱ्या कमी करण्यावर अमेरिकी प्रशासनाचा जोर आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनानुसार, अमेरिकेचा आरोग्य विभाग सरकारच्या खर्चात कपात करण्याच्या निर्णयाचा एक भाग म्हणून पूर्णवेळ काम करणाऱ्या सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

निश्चित वेळेपेक्षा आधी निवृत्ती आणि तथाकथित ‘स्थगित राजीनामे’ यांचा देखील समावेश यामध्ये करण्यात आला असून एकूण कपातीमुळे विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या 82 हजारावरून 62 हजारापर्यंत कमी होईल.

आम्ही केवळ नोकऱ्या कमी करत नसून देशाच्या आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्याच्या उद्देशाने नवे बदल करत आहोत. दीर्घकालीन आजाराच्या साथींना रोखण्यासाठीच्या यंत्रणांना आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देणे आणि आरोग्य यंत्राणांच्या उद्दिष्टांची पूर्ती अशी ध्येये समोर ठेवून ही निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य आणि मानव सेवा सचिव रॉबर्ट एफ केनेडी (ज्युनियर) यांनी दिली.