गुगलवर क्रोम ब्राऊझर विकण्यासाठी दबाव

गुगलचे इंटरनेट ब्राऊझर गुगल क्रोम विकण्यासाठी अमेरिकी सरकार दबाव आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसकडून हा दबाव आणला जात आहे. गुगल सर्चवर चुकीच्या पद्धतीने मार्केट कॅप्चर केल्याचा आरोप असून यूएस सरकारला गुगल क्रोमची मक्तेदारी कमी करायची आहे. त्यामुळे हा दबाव आणला जात आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने गुगलला अँटी ट्रस्ट नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. सर्च आणि ऍडव्हर्टायझिंग मार्केटमधील गुगलने आपल्या मक्तेदारीचा गैरफायदा घेतला आहे, असे अमेरिकेच्या न्यायालयाने म्हटले आहे.