बराक ओबामांकडून हिंदुस्थानी चित्रपटाचे कौतुक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हिंदुस्थानी चित्रपट ‘ऑल वी इमेजिन इज लाइट’ या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. या चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये क्रीनिंग झाली होती. तसेच या चित्रपटाला कान्सचा दुसरा सर्वात मोठा अवॉर्ड ‘ग्रांड प्रिक्स’ सुद्धा मिळाला होता. ओबामा यांनी आपल्या आवडत्या चित्रपटांची लिस्ट अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली. या लिस्टमध्ये ‘ऑल वी इमेजिन इज लाइट’ या चित्रपटाचा समावेश आहे. हा चित्रपट आवर्जून पाहावा, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ओबामा यांना जे 10 चित्रपट आवडले त्यात ‘कॉन्क्लेव’, ‘द पियानो लेसन’, ‘द प्रॉमिस्ड लँड’, ‘द सीड ऑफ द सेक्रेड फिग’, ‘डयूनः पार्ट टू’, ‘एनोरा’, ‘दीदी’, ‘शुगरकेन’, ‘ए कंप्लीट अननोन’ या चित्रपटाचा समावेश आहे.