अमेरिकेचा हुथी बंडखोरांच्या तेल बंदरावर हल्ला, 74 ठार; 171 जखमी

येमेनमधील हुथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या तेल बंदरावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात 74 लोक ठार आणि 171 जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बंडखोरांना लक्ष्य करणाऱ्या नवीन मोहिमेतील हा सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचे बंडखोर गटाने म्हटले आहे. 15 मार्चपासून ट्रम्प यांनी नवीन मोहीम राबवली असून सातत्याने बंडखोर गटाला लक्ष्य केले जात आहे. मात्र अमेरिकन सैन्याच्या सेंट्रल कमांडने अद्याप या मोहिमेबद्दल अधिक माहिती दिली नसून आतापर्यंत किती लोक मारले गेले आहेत याबद्दल कोणताही तपशील जाहीर केला नाही.