हिंदुस्थानी संशोधकाला अटक

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हमासशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठातील संशोधक बदर खान सुरी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, सुरी हे व्हिसावर शिक्षण घेत होते तसेच शिक्षण म्हणूनही काम करत होते, असे जॉर्जटाउन विद्यापीठाने म्हटले आहे. तर पत्नी ही मूळची पॅलेस्टिनी असल्याने जाणूनबूजून आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप सुरी यांनी केला आहे.