
सध्याच्या घडीला अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ‘डाकू महाराज’ या चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाबद्दल चर्चेत आहे. उर्वशी रौतेला ही कायमच तिच्या वागण्यामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत असते. ‘डाकू महाराज’ हा तेलगु भाषेतील साहसी चित्रपट असून, या चित्रपटात उर्वशीने अतिशय छोटी भूमिका केली होती. परंतु तिच्या या भुमिकेसाठी ती चर्चेत नव्हती. पण उर्वशी चर्चेत आली ती,तिने घेतलेल्या मानधनासाठी.
माध्यमांच्या म्हणण्यानुसार फक्त एका गाण्यासाठी उर्वशीने तब्बल तीन करोड रुपये मानधन घेतले होते. या सर्व घडामोडींमध्ये उर्वशीने मात्र तिने तीन करोड घेतले यावर कुठलेही भाष्य केली नाही. यातील ‘दाबिडी दाबिडी’ गाण्यावर उर्वशीने नृत्य केले होते. केवळ तीन मिनिटांच्या गाण्यासाठी तीन करोड घेतले म्हणून उर्वशी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याआधी उर्वशीने ती या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे असे म्हटले होते. परंतु डाकू महाराज रिलीज झाल्यानंतर मात्र ती फक्त एकाच गाण्यामध्ये दिसल्यामुळे चांगलीच ट्रोलही झाली होती.
‘डाकू महाराज’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करताना यामध्ये उर्वशीचे एकही प्रमोशनल फोटो नव्हता. त्यामुळे त्यावरुनही उर्वशीला सोशल माध्यमांवर ट्रोल करण्यात आले होते. माध्यमांच्या माहितीनुसार उर्वशीची मालमत्ता ही 236 करोडोंची असून, तिची सर्वाधिक कमाई ही सोशल मीडीया आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून होते.
‘डाकू महाराज’ या चित्रपटासाठी उर्वशीने फक्त तीन मिनिटांचे काम करण्यासाठी तीन करोड घेतले होते. उर्वशी रौतेलाचा या चित्रपटातील रोल काही मोठा नव्हता. त्यामुळेच सध्याच्या घडीला उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे.