
>> पराग खोत
भूतकाळाच्या गूढ गर्भातील अशा काही व्यक्तिरेखा चिरविश्रांती घेत असतात आणि चैतन्याचा स्पर्श झाल्यावर त्या सुप्तावस्थेतून बाहेर येतात. त्यावर चढलेली विस्मृतीची पुटं विरत जाऊन त्या जिवंत होतात. अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे लक्ष्मणाची पत्नी ऊर्मिला. रामायणात पुसट उल्लेख असलेली ही ऊर्मिला, चौदा वर्षं पतीच्या विरहाचं दुःख सोसत राहिली एवढीच काय ती आपल्याला तिची ओळख. ऊर्मिलेची हीच खंत आणि तिचा आाक्रोश समर्थपणे मांडणारे हे नाटक `ऊर्मिलायन.’
आपल्या अंतरात्म्याला डागण्या देणारं, अतीव वेदनादायी दुःख मोठं, की त्याकडे इतरांचं दुर्लक्ष होऊन त्याचं झालेलं अवमूल्यन मोठं? दुर्दैवाने ऊर्मिलेच्या वाटय़ाला या दोन्ही गोष्टी आल्या. प्रभू रामचंद्राला वनवासाची आज्ञा होताच क्षणाचाही विलंब न करता, त्याच्यासोबत निघालेली भार्या सीता आणि बंधू लक्ष्मण अजरामर झाले. पण त्यांच्यासह वनात जायला तयार असूनही तो हक्क नाकारल्या गेलेल्या ऊर्मिलेच्या वाटय़ाला पतिवियोगाचं दुःख पचवूनही उपेक्षाच आली. असीम त्याग करूनही ती सामान्यच राहिली. ऊर्मिलेची हीच खंत आणि तिचा आाढाsश समर्थपणे मांडणारं हे नाटक `ऊर्मिलायन.’
स्मिता दातार यांच्या `अयोध्येची ऊर्मिला’ या कादंबरीवर आधारित कथासूत्रावर लेखकद्वय स्मिता दातार – सुनील हरिश्चंद्र आणि दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी हे पौराणिक, ऐतिहासिक नाटय़ रंगवलं आहे. रामायणात पुसट उल्लेख असलेली ऊर्मिला, चौदा वर्षं पतीच्या विरहाचं दुःख सोसत राहिली एवढीच काय ती आपल्याला तिची ओळख. मात्र प्रत्यक्षात ही राजस्त्राr कशा प्रकारचं आयुष्य जगली असेल? राम-लक्ष्मण-सीता वनवासात गेल्यावर मागे उरलेल्या ऊर्मिलेच्या अनुल्लेखाने ती विस्मृतीत गेली. ऊर्मिला ही राजा जनकाची कन्या होती आणि भूमिकन्या सीतेची धाकटी बहीण होती हे तथ्य आपल्यापैकी किती जणांना ज्ञात आहे? आयुष्यभर राजभवनात राहून ऊर्मिलेनेच खरा वनवास भोगला. तरीही त्या काळात एकाकी पडलेली ऊर्मिला, मनस्वीपणे आयुष्याला भिडली. ती दुर्बल नव्हती, तर ती एक योद्धा होती. ऊर्मिलेच्या आयुष्याचा, तिच्या अस्तित्वाचा आणि तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा अतिशय वेगवान आणि रोचक पद्धतीने या नाटकातून घेतला गेला आहे. भूतकाळाच्या गूढ गर्भात काही व्यक्तिरेखा चिरविश्रांती घेत असतात आणि चैतन्याचा स्पर्श झाल्यावर त्या सुप्तावस्थेतून बाहेर येतात. त्यावर चढलेली विस्मृतीची पुटं विरत जाऊन त्या जिवंत होतात. या नाटकाच्या निमित्ताने असाच एक प्रयत्न झाला आहे. रामायण काळातल्या या उपेक्षित स्त्राrची ओळख आपल्या जाणिवा बदलून टाकते आणि राजकन्या ऊर्मिलेची उलाघाल थेट आजच्या वर्तमानकाळातल्या स्त्राrच्या जगण्याला येऊन भिडते.
मिथिलेच्या युद्धशाळेत प्रथम भेटीतच अयोध्येच्या राजपुत्रावर लक्ष्मणावर, अनुरक्त झालेल्या ऊर्मिलेचा त्याच्यासोबत विवाह होतो आणि ती अयोध्येत येते. नव्या ठिकाणी तिला परकेपणा जाणवू नये म्हणून लक्ष्मण तिच्या महालाची सजावट थेट तिच्या मिथिलेच्या महालासारखी करवून घेतो. लक्ष्मण आणि ऊर्मिलेचं वैवाहिक आयुष्य बहरत असतानाच ती अकल्पित घटना घडते आणि ऊर्मिला उद्ध्वस्त होते. राम आणि सीतेसोबत ऊर्मिलेचा सखा लक्ष्मण, तिला न भेटता, न सांगताच वनवासात निघून जातो. त्याच्यासोबत जाण्यास ऊर्मिलेला मनाई केली जाते आणि तिचा आाढाsश संपूर्ण अयोध्येत भरून राहतो. रामलक्ष्मणानंतर राजपुत्र भरत अत्यंत विरक्त मनाने राज्य कारभार सांभाळतो आणि ऊर्मिलेचं मूक आांढदन सुरू होतं. नाटकात हे सगळे तपशिलात येतं, रामायणातल्या तुलनेने अलक्षित असलेल्या व्यक्तिरेखा आपल्यासमोर उलगडत जातात आणि आपण निशब्द होतो.
संशोधन आणि संदर्भ यांच्या बळावर एक विश्वासार्ह आणि प्रभावी संहिता तयार करून मोजक्या प्रमुख पात्रांद्वारे हे नाट्य उभे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भरत, लक्ष्मण, सीता, धनु आणि ऊर्मिला या अवघ्या पाच प्रमुख पात्रांना इतर अकरा अनाम पात्रांनी पाठबळ दिलं आहे. ह्या कथेत राम, दशरथ, कैकेयी आणि इतरांचे फक्त उल्लेख येतात, पण हे आयन आहे ते ऊर्मिलेचं. तिच्या दबलेल्या भावनांना आणि जगलेल्या आयुष्याला पूर्णत न्याय देणारे हे नाट्य आहे.
सुरुवातीला काहीसा विस्कळीत वाटणारा प्रयोग नंतर एक लय पकडतो आणि त्यानंतर अधिकाधिक प्रभावी होत जातो. सर्वच प्रमुख कलावंतांनी उत्तम कामे केली आहेत. अजय पाटील (भरत), अमोल भारती (लक्ष्मण), पूजा साधना (धनु), कल्पिता राणे (सीता) यांनी आपापली कामं नीट समजून केली आहेत आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक आहेच. पण विशेष उल्लेख करावा लागेल तो कथानायिका ऊर्मिला झालेल्या निहारिका राजदत्त हिचा. ऊर्मिलेचा प्रत्येक हुंदका तिने जिवंत केला आहे. तिचा कणखरपणा, तिचा संताप इथपासून ते तिची अगतिक हतबलता ती आपला आवाज आणि देहबोलीतून अप्रतिम दाखवते. तिचं भाषेवरील प्रभुत्व आणि संवादफेक उल्लेखनीय. लेखन दिग्दर्शनात तिच्यासाठी निर्माण केलेल्या जागा तिने समंजसपणे घेतल्या आहेत. तलवारबाजीचा प्रसंग अधिक ठाशीव आणि विश्वासार्ह व्हायला हवा आणि तो होत जाईल. भरत झालेल्या अजय पाटील यांनी माता कैकेयीविषयीचा संताप आणि राज्य कारभार चालवण्यातील विरक्ती सक्षमपणे दाखवली. लक्ष्मण साकारणारा अमोल भारती आश्वासक वाटतो, मात्र त्याने उच्चारशुद्धतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनी आणि संगीत हे अत्यंत पूरक झाले आहे. त्याचा परिणाम सबंध नाटकावर जाणवतो.
व्यावसायिक रंगमंचावर नव्या कलाकारांना घेऊन हे वेगळ्या विषयावरचं नाटक घेऊन येणाऱ्या निर्माता निखिल जाधव तसंच सूत्रधार दिनू पेडणेकर आणि अरविंद घोसाळकर यांचं अभिनंदन. `सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग… काळाच्या रथपात आपलं स्त्रीपण बहाल केलेल्या तमाम स्त्रियांना अभिवादन करून…’ अशी टॅगलाईन असलेल्या या नाटकाला सर्वांनीच हाऊसफुल्ल करायला हवं. तरच सुमुख चित्र आणि अनामिका या संस्थांनी केलेल्या या धाडसी प्रयत्नाचं अनुकरण केलं जाईल आणि अशाच इतर दुर्लक्षित पाऊलखुणा नाटकातून दृष्टीस पडतील.