परफ्युमच्या बाटलीतून विकत होता मानवी मूत्र, असा झाला पर्दाफाश

परफ्युमचे शौकीन असणाऱ्यांसाठी ही खास बातमी आहे. परफ्युमबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला नकली आणि हानिकारक परफ्युम बनवत असल्याप्रकरणी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तो व्यक्ती परफ्युम मानवी मूत्रापासून बनवत होता.

मीडिया वृत्तानुसार, ही संपूर्ण घटना लंडन मधील असून गेल्यावर्षीची आहे. ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक व्यापारी बराच काळ परफ्युम बनविण्याचे काम करत होता. त्याने बनवलेले परफ्युम आकर्षक बाटल्यांमध्ये पॅक करुन विक्रेत्यांना विकत होता. त्यामुळे त्याला या व्यापारात नफाही बराच होत होता.

मात्र अचानक त्याच्या परफ्युमबाबत अनेकांना शंका येऊ लागली आणि काहींनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या एका ठिकाणावर छापा मारुन पोलिसांनी पर्दाफाश केली. तो तिथे नकली परफ्युम विकत होता. जवळपास 400 नकली परफ्युमच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

सगळ्यात भयंकर म्हणजे तो त्या परफ्युममध्ये मानवी मूत्र मिक्स करत होता. पोलिसांना सापडलेल्या बाटल्यांमध्ये नकली परफ्युममध्ये जीवघेणे रसायन आणि मानवी मूत्र होते. हे नकली परफ्युम असली परफ्युमप्रमाणेच दिसतात. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चैौकशी केली असता आरोप खरे असल्याचे सिद्ध झाले.