Uran Murder : यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

उरणमधील यशश्री शिंदे हिच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला नवी मुंबईच्या गुन्हे विभागाने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे.

उरण मधील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करून त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून झुडपात फेकण्य़ात आले होते. या घटनेनंतर उरणमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उरणकरांचा मोर्चा निघाला. या प्रकरणातील नराधमाला अटक करून त्याला तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली.