यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024चा आज निकाल जाहीर झाला असून तो upsc.gov.in या वेबसाईटवर पाहता येईल. तसेच या मुख्य परीक्षेत यश मिळकलेले सर्व उमेदवार हे पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. यूपीएससी सीएसई पूर्व परीक्षा ही 16 जून रोजी घेण्यात आली होती, तर मुख्य परीक्षा ही सप्टेंबर महिन्यात 20, 21, 22, 28 आणि 29 या तारखेला घेण्यात आली होती. त्यानंतर आज मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हे सर्व उमेदवार 13 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत डिटेल्स अर्ज भरतील. या आधारावर त्यांची दिल्लीतील यूपीएससीमध्ये मुलाखत होणार आहे.