केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिव्हिल सेवा परीक्षा 2024 साठीच्या मुलाखतीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून बदललेली तारीख यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना 5 फेब्रुवारी रोजी मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते त्यांना आता 8 फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आले आहे. मुलाखत परीक्षा 7 जानेवारीपासून सुरू झाल्या असून त्या 17 एप्रिल 2025 पर्यंत चालणार आहेत.