यूपीआय व्यवहार 5 टक्क्यांनी घटले

फेब्रुवारी  महिन्यात देशामध्ये 16.11 अब्ज युपीआय व्यवहार झाले असून त्यांचे मूल्य 21. 48 लाख कोटी रुपये आहे. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत यूपीआय व्यवहारांच्या संख्येत पाच टक्क्यांची घट झाली असून त्याचे मूल्य 6.5 टक्क्यांनी घटले आहे.

जानेवारीमध्ये एकूण 16.99 अब्ज व्यवहार झाले होते आणि त्यांचे मूल्य 23.48 लाख कोटी रुपये होते. फेब्रुरुवारी 2024 च्या तुलनेत व्यवहारांचे प्रमाण 33 टक्के आणि मूल्य 20 टक्के वाढले आहे, असे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जाहीर केले आहे.