यूपीआयने पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑक्टोबरमध्ये यूपीआय ट्रान्झॅक्शनचा आकडा 10 अब्जच्या पार गेला आहे. 31 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी 64.4 कोटी ट्रान्झॅक्शन नोंदवले गेले. एक दिवसातील हा उच्चांक आहे. मात्र त्याचवेळी डेबिट कार्ड आणि मोबाईल वॉलेट ट्रान्झॅक्शनमध्ये घट झालेली दिसून येतेय. यूपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये दिवसागणिक वाढ दिसून येतेय. त्यातही देशात डिजिटल पेमेंटमध्ये यूपीआयला जास्त पसंती मिळताना दिसून येतेय.