यूपीआय सेवा ठप्प झाल्याने दिवसभर तारांबळ

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआय वापरून पेमेंट करणाऱ्यांना आज पुन्हा एकदा अडचणींचा सामना करावा लागला. पेटीएम, पह्न पे आणि गुगल पे यांसारख्या लोकप्रिय अॅप्स वापरताना वापरकर्त्यांना अडचण झाली. डाऊनडिटेक्टरनुसार, सकाळी 11.30 च्या सुमारास यूपीआय वापरताना ग्राहकांना अडचण येऊ लागली. गेल्या एका वर्षात यूपीआय डाऊन होण्याची ही सहावी घटना आहे. ऑनलाइन सेवा आणि अॅप्सच्या डाऊन किंवा बिघाड झाल्याबद्दल माहिती देणारी वेबसाईट डाऊन डिटेक्टरवर तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

गैरसोयीबद्दल खेद आहे – एनपीसीआय

सतत यूपीआय सेवा डाऊन होत असल्याने ही समस्या सामान्य होत चालली आहे. आम्ही सध्या तांत्रिक समस्यांना तोंड देत आहोत. त्यामुळे यूपीआय सेवेवर परिणाम होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी काम सुरू असून याबाबतचे अपडेट देत राहू. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे, असे यूपीआय पायाभूत सुविधांची देखरेख करणाऱया नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ‘एक्स’ पोस्टद्वारे सांगितले.