यूपीआय सेवा ठप्प, ग्राहकांचा संताप

देशभरात यूपीआय सेवा आणि गुगल पे सेवा ठप्प झाल्याने अनेक ग्राहकांना समस्येला तोंड द्यावे लागले. नेमकी ही सेवा कशामुळे डाऊन झाली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वीदेखील घडला होता. बुधवारी सायंकाळी यूपीआय सेवा डाऊन झाल्याने वापरकर्त्यांना ऑनलाईन व्यवहार करताना अडचणी येऊ लागल्या. यामुळे यूजर्सना अॅपवरून पेमेंट करता येत नव्हते.