
मासिक पाळीमुळे नवरात्र विधी पाळता न आल्याने नैराश्येतून एका विविहितेने टोकाचे पाऊल उचलले. उत्तर प्रदेशातील झाशी येते 36 वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून जीवन संपवले. प्रियांशा सोनी असे मयत महिलेचे नाव आहे. प्रियांशाच्या पश्चात पती आणि दोन मुली आहेत. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी प्रियांशाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.
सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे. या नवरात्रीच्या पूजा-विधी करण्यासाठी प्रियांशा फार उत्सुक होती. तिने पूजा-विधीची संपूर्ण तयारी केली होती. मात्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिला मासिक पाळी आली. यामुळे आपल्याला पूजा करता येणार नाही म्हणून प्रियांशा नाराज झाली. याच नैराश्येतून तिने विष प्राशन केले.
प्रियांशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. प्रियांशा सोनी तिचे पती मुकेश सोनी आणि त्यांच्या दोन मुली, साडेतीन वर्षांची जान्हवी आणि अडीच वर्षांची मानवी यांच्यासोबत राहत होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.