
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, हे वाक्य तुम्ही एकदा तरी ऐकलं असेल. या वयाच्या बंधनाला मोडून मुलगीची आईच होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये घडली आहे. 9 दिवसांनी मुलगी ज्या व्यक्तीसोबत सात जन्माची गाठ बांधणार होती, त्याच व्यक्तीसोबत आईने आपली गाठ बांधली. त्यामुळे मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
सदर घटना अलिगढ जिल्ह्यातील मनोहरपूर गावात घडली आहे. तक्रारकर्ते जितेंद्र कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी त्यांच्या मुलीचे लग्न होणार होते. त्यासाठी त्यांची सगळी तयारी झाली होती. तसेच पत्रिका वाटूनही झाल्या होत्या. परंतु दुसरीकडे पत्नीचे होणाऱ्या जावयासोबत प्रेमसंबंध जुळल्याचे कोणालाच माहिती नव्हते. तासंतास दोघ एकमेकांसोबत फोनवर बोलत होते. याच दरम्यान वेळ साधून दोघेही गायब झाले. पहिल्यांदा दोघांवर कोणाचाही संशय आला नाही. परंतु नंतर दोघेही सोबतच पळून गेल्याचे उघड झाले. मुलीच्या आईने सोबत जाताना घरातील मोल्यवान दागिने सुद्धा लंपास केले आहेत. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.