मुराबादमध्ये एका तरुणाची जबर मारहाण करून हत्या करण्यात आली. या तरुणाला जमावाने गोहत्या करताना पकडले होते अशी माहिती पोलीस अधीक्षक रण विजय सिंह यांनी दिली. जमावाने तरुणाला लाठय़ा-काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी या घटनेबाबत कळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला रुग्णालयात दाखल केले. येथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शाहिदीन असे या तरुणाचे नाव आहे.