Unsafe cars in India: ‘या’ कार्सची देशात होते सर्वाधिक विक्री, मात्र सुरक्षेत पडतात कमी; पाहा लिस्ट

आता देशात गाड्यांच्या सुरक्षेची खूप चर्चा आहे, मात्र काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आता एंट्री कारमध्येही ड्युअल एअर बॅग येऊ लागल्या आहेत. पण फक्त सेफ्टी फीचर्स पुरेशी आहेत का? कारण सेफ्टी फीचर्ससोबतच बॉडी सॉलिड असणं खूप गरजेचं आहे. यातच आपण अशा काही कार्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची विक्री देशात सर्वाधिक आहे. मात्र सेफ्टीत या कार्स मागे पडतात.

Hyundai Grand i10 Nios

रेटिंग: 2 स्टार

Hyundai Grand i10 ही एक हॅचबॅक कार आहे. ही कार याच्या सेगमेंटमध्ये सर्वात आरामदायी कार आहे. पण ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये याला 2 स्टार रेटिंग मिळाली आहे. अपघात झाल्यास ही कार तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकणार नाही, असं या रेटिंग वरून म्हणता येईल. यात 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. या कारची किंमत 5.93 लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti WagonR

रेटिंग: 1 स्टार

असुरक्षित कारच्या यादीत मारुती वॅगन-आरचेही नाव आहे. या कारची देशात सर्वाधिक विक्री झाली आहे. पण जेव्हा सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा ही कार मागे पडते. वॅगन-आर ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये सपशेल अपयशी ठरली आहे. प्रौढांच्या सुरक्षेमध्ये याला 1 स्टार रेटिंग आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये जिरो स्टार रेटिंग मिळाली आहे. अपघात झाल्यास ही कार तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकणार नाही.

Maruti Alto K10

रेटिंग: 2 स्टार

आधी अल्टोची सर्वाधिक विक्री होत होती. मात्र आता वाढलेल्या किमतीमुळे ही कार सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. अल्टो ही दैनंदिन वापरासाठी चांगली कार आहे. सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर ही कार एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमने सुसज्ज आहे. परंतु ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये अपयशी ठरली आहे. याला प्रौढ सुरक्षेमध्ये 2 स्टार रेटिंग आणि मुलांच्या सुरक्षेमध्ये झिरो स्टार रेटिंग मिळाली आहे.