पंजाबमधील आम आदमी पक्षाचे (आप) नेते राजविंदर सिंग यांच्यावर तरनतारन येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची घटना सोमवारी घडली. या हल्ल्यात सिंग यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले. मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञातांनी ठक्करपुरा गावातील चर्चजवळ सिंह यांच्या कारवर गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आपच्या महिला सरपंचाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सिंग हे सहकाऱ्यांसह त्यांच्या गावी चालले होते. यादरम्यान ठक्करपुरा गावात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली आणि गोळीबार केला. याच सिंग यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य दोघे जखमी झाले.
गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत तपास सुरू केला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हा हल्ला कुणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबतही पोलीस सखोल तपास करत आहेत.