
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी अज्ञात भाविकाने सुमारे एक कोटी किंमतीचे गुप्त दान दिले आहे. भाविकाने 11 सोन्याची बिस्किटे मंदिरात दान केली आहेत.
मंदिर परिसरातील चोपदार दरवाज्यातील सिंहासन पेटी-2 मध्ये 1 किलो 100 ग्रॅम वजनाची 11 सोन्याची बिस्कीट टाकण्यात आली आहेत. या बिस्कीटावर 999 म्हणजे शुद्ध 24 कॅरेट सोने असे लिहिले आहे. या 1 किलो 100 ग्रॅम सोन्याचे बाजार मूल्य 1 कोटी रुपयांच्या घरात आहे. 28 मार्चला शुक्रवारी दानपेटी उघड केल्यावर हा प्रकार लक्षात आला.
View this post on Instagram