जोपर्यंत सर्व हिंदुस्थानी देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला परमधर्म मानत नाही तोवर असे हल्ले होत राहणार, पियुष गोयल यांचे विधान चर्चेत

जोपर्यंत सर्व हिंदुस्थानी देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला परमधर्म मानत नाही तोवर असे हल्ले होत राहणार, असे विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. तसेच पाकिस्तानने हिंदुस्थानसोबत व्यापर बंद केल्याने पाकिस्तानचेच नुकसान आहे असेही गोयल म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना गोय म्हणाले की, आताच्या घडीला 140 कोटी हिंदुस्थानी देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला परमधर्म मानत नाही तोवर असे हल्ले होतच राहणार. आज संपूर्ण देशात हिंदुस्थान संपूर्ण जगात एक मोठी ताकद म्हणून उभा राहिला आहे. ही बाब पाहून अनेक देशांना त्रासदायक ठरली आहे. अशा प्रकारे हिंदुस्थानवर हल्ला करणाऱ्यांना हिंदुस्थान योग्य उत्तर देईल. दशहतवाद पोसणारी वृत्ती हिंदुस्थानातून नष्ट होईल असेही गोयल म्हणाले.