नागपूर विमानतळाच्या रनवेच्या रिकार्पेटिंगचे काम गेल्या दीड वर्षांपासून रखडले आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरकरांची माफी मागितली आहे. तसेच हे काम ज्या कंत्राटदाराला दिले आहे त्याला तंबीही दिली आहे.
नितीन गडकरी यांनी नागपूर विमानतळाला भेट दिली. तेव्हा गडकरी म्हणाले की, या कामाला दिरंगाई झाली त्या प्रकरणी मी माफी मागतो. पुढच्या एक महिन्यात हे काम पूर्ण होईल. दिल्लीत जाऊन मी एअरपोर्ट ऑथोरिटीच्या चेअरमन यांना बोलावून घेणार. या कामाचा कंत्राटदार हा इंदूरचा आहे. त्यांनाही मी फोन करून हे काम वेळेत न झाल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी दिली आहे. तसेच जे जे कर्मचारी या कामाशी निगडीत आहेत त्यांनाही कामावरून काढून टाकण्याची तंबी दिल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.