‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आज संसदेत सादर केले जाऊ शकते. केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल हे विधेयक सादर करणार असल्याचे वृत्त आहे. तसेच यासंदर्भात एनडीएच्या सर्व घटक पक्षांची चर्चा झाली असून सर्व पक्ष यासाठी अनुकूल असल्याची माहिती आहे. 12 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली.
‘एक देश, एक निवडणूक’ यावर विचार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते. प्रस्तावाला 32 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, तर 15 पक्षांनी विरोध केला, असे या समितीने सांगितले.
देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र होतात. अर्थात वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात. मात्र, कायदा झाल्यानंतर देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची तयारी आहे.