
नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, अन्यथा त्यांना सुरक्षा दलाशी सामना करावा लागेल. शस्त्राच्या बळावर आदिवासींचा विकास कोणीही रोखू शकत नाही. पुढच्या चैत्र नवरात्रीपर्यंत बस्तरमधील लाल दहशत पूर्णपणे संपवून टाकू, असा इशारा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला. छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील बस्तर पंडुम महोत्सवाच्या समारोपात बोलताना शहा यांनी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, असे सांगितले.