पाचवी ते आठवी ढकलपास बंद, नो डिटेन्शन पॉलिसी रद्द

पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गात अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी आता अनुत्तीर्णच असणार आहेत. त्यांना पुढच्या वर्गात ढकलले जाणार नाही. कारण केंद्राने नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरीही त्यांचे वर्ष वाया जाणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुढील दोन महिन्यांत पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल. दुसऱ्यांदा नापास झाल्यास मात्र पुढील वर्गात ढकलले जाणार नाही.