अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीय, नोकरदारांना दिलासा देताना 12 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून मोठा दिलासा दिला, पण त्याच वेळी नवीन करप्रणाली जाहीर करताना 4 लाख ते 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लागू केला. 8 ते 12 लाख उत्पन्नावर 10 टक्के, 12 ते 16 लाख उत्पन्नावर 15 टक्के कर लावण्यात आला आहे. यामुळे जनतेत काही संभ्रम आहे. पण 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त म्हणजे 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 75 हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन लागू होईल. यामुळे 4 लाख ते 12 लाख यामधील दोन्ही स्लॅबसाठी जाहीर केलेला 5 टक्के आणि 10 टक्के कर हा 75 हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शनमधून करमुक्त होणार आहे. त्यामुळे 5, 10 किंवा 15 टक्के कर जाहीर करूनही कोणताही कर भरावा लागणार नाही.
अशी होणार बचत
- 16 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना सध्या 1.84 लाख रुपये कर भरावा लागतो. नवीन स्लॅबनुसार 1.30 लाख रुपये कर भरावा लागेल. 54600 रुपयांची बचत होईल.
- 25 लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱयांना सध्या 434200 रुपयांचा कर भरावा लागतो. नवीन स्लॅबनुसार 329800 रुपयांचा कर भरावा लागेल. त्यामुळे 114400 रुपयांची मोठी बचत होईल.
- वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपये असणाऱ्यांना 1.30 लाख रुपये सध्या कर भरावा लागतो. नवीन स्लॅबनंतर त्यांना 97500 रुपये कर भरावा लागेल. त्यामुळे 32500 रुपयांची बचत होईल.
- 13 लाख रुपये उत्पन्न असेल तर सध्या 88400 रुपये कर भरावा लागतो. पण नवीन स्लॅबनुसार 66300 रुपये कर भरावा लागेल. त्यामुळे 22100 रुपयांचा फायदा मिळेल.
- 22 लाख रुपये उत्पन्न असणाऱयांना सध्या 3.40 लाख रुपयांचा कर भरावा लागतो. नवीन स्लॅबनुसार 240500 कर भरावा लागेल. 1 लाख रुपयांची बचत होईल
असा मिळणार फायदा
उत्पन्न सध्याचा कर नवीन कर फायदा
- 12 लाख 17500 0 71500
- 13 लाख 88400 66300 22100
- 15 लाख 130000 97500 32500
- 16 लाख 184600 130000 54600
- 22 लाख 340600 240500 100100
- 25 लाख 434200 329800 114400
नवीन करप्रणाली
उत्पन्न कर
- 0 ते 4 लाख 0 टक्के
- 5 ते 8 लाख 5 टक्के
- 8 ते 12 लाख 10 टक्के
- 12 ते 16 लाख 15 टक्के
- 16 ते 20 लाख 20 टक्के
- 20 ते 24 लाख 25 टक्के
- 24 लाखांपुढे 30 टक्के