Budget 2025 – ऋषभ पंतला धक्का, 8 कोटींवर पाणी फिरणार; ‘या’ खेळाडूंचाही खिसा फाटणार!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर केला. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा IPL 2025 वरही परिणाम होणार आहे. आयपीएलच्या मेगा लिलाव प्रक्रियेत अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. परंतु आता त्यांना मानधनातील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करावी लागणार आहे. आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या ऋषभ पंतलाही 8 कोटी रुपये कर स्वरुपात द्यावे लागणार आहेत.

IPL 2025 ची लीलाव प्रक्रिया सौदी अरबच्या जेद्दाह शहरामध्ये पार पडली. या लिलाव प्रक्रियेसाठी खेळाडूंची मुळ किंमत 30 लाख रुपये ठेवण्यात आली होती. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार 24 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला 30 टक्के कर भरावा लागणार आहे. म्हणजेच ज्या खेळाडूंना कमीत कमी 30 लाख रुपयांची बोली लागली आहे, अशा सर्व खेळाडूंना 30 टक्के म्हणजेच 9 लाख रुपये इतका कर भरावा लागणार आहे. आयपीएल 2025 च्या हंगामात ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्सनने 27 कोटी रुपयांना खरेदी करत आपल्या ताफ्यात घेतले आहे. परंतु त्याला आता जवळपास 8 कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागणार आहे. म्हणजेच त्याला मानधन स्वरुपात 18.9 कोटी रुपये मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या खेळाडूंना 1 कोटी रुपये इतकी बोली लागली आहे. अशा सर्व खेळाडूंना 30 टक्के कराची रक्कम वजा करून फक्त 70 लाख रुपये इतकेच मानधन मिळणार आहे.