
केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यांच्या हक्कावर गदा आणली आहे. तसेच राज्याराज्यांमध्ये भेदभाव करण्यात आला आहे, असा आरोप इंडिया आघाडीकडून करण्यात आला. याविरोधात इंडिया आघाडीकडून बुधवारी संसदेत विरोध प्रदर्शन करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मंगळवारी संध्याकाळी विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
या अर्थसंकल्पामुळे राज्यांच्या हक्कांवर गदा आणण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीकडून बुधवारी सकाळी 10.30 वाजता संसदेत विरोध प्रदर्शन करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पावर नाराज असलेल्या विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. नीती आयोगाठी बैठक 27 जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीबाबतही चर्चा करण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पात तामिळनाडूकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आपण 24 तारखेला होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार घालत असल्याचे तामिळनाडूचे मुखअयमंत्री ए.के. स्टॅलिन यांनी सांगितले.