
ऑटोमोटिव्ह सीसीवर 6 विकेट राखून विजय मिळवत युनियन बँक संघाने ओरिएंटल इन्शुरन्स शिल्ड टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तनय खानदेशीची अष्टपैलू चमक त्याच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
क्रॉस मैदान येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मंगळवारी ऑटोमोटिव्ह सीसीला 20 षटकांत 7 बाद 136 धावांवर रोखण्यात युनियन बँकेच्या गोलंदाजांना यश आले. त्यात तनय खान्देशी (2/30) आणि दीप गौरवने (2/32) मोलाचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल युनियन बँकेने 18.4 षटकांत 4 विकेटच्या बदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. तनय खान्देशीने सर्वाधिक नाबाद 36 धावा काढताना आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. रूप यादव (31), आदिल शेख (28), फैजान रब्बानीने (27 नाबाद) चांगली फलंदाजी करताना विजय आणखी सुकर केला.
संक्षिप्त धावफलक ः ऑटोमोटिव्ह सीसी – 20 षटकांत 7 बाद 136 (चिराग वकील 22, रूपेश सिंग 22, निखिल मांडले 22; तनय खान्देशी 2/30, दीप गौरव 2/32) वि. युनियन बँक ऑफ इंडिया – 28.4 षटकांत 4 बाद 138 (तनय खान्देशी 36 ना. रूप यादव 31, आदिल शेख 28, फैजान रब्बानी 27 ना.)