
युनियन बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात कपात केली आहे. बँकेच्या या निर्णयानंतर आता सामान्य नागरिकांना बँकेतील एफडीवर वार्षिक 3.50 टक्के ते 7.15 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर आता वेगवेगळय़ा बँका आपल्या एफडी व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेत आहेत. याआधी स्टेट बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात 0.20 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.