फक्त 60 टक्के देशांतील शाळांमध्ये खाण्यापिण्याचे नियम

काही शाळांमध्ये मुलांच्या खाण्यापिण्याचे नियम कडक असतात, तर काही शाळांमध्ये याबाबत काहीच नियमावली नसते. युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्टनुसार, फक्त 60 टक्के देशांमधील शाळांमध्ये अन्न आणि पेये यासंबंधी मानकं आहेत. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनच्या नेतृत्वाखालील रिसर्च कन्सोर्टियम फॉर स्कूल हेल्थ अँड न्यूट्रीशनच्या सहकार्याने नुकताच एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार 187 पैकी 93 देशांमध्ये शालेय अन्न आणि पेयं यावर कायदे, अनिवार्य मानके किंवा मार्गदर्शक तत्त्वे आहे. 93 देशांपैकी फक्त 29 टक्के देशांमध्ये शाळांमध्ये अन्न आणि पेयं वितरणावर बंदी घालण्याचे उपाय होते.

तीन देशांत नियमित मूल्यांकन

शाळांमधील खाद्यपेयांसंदर्भात 28 पैकी फक्त 3 देशांमध्ये नियमितपणे मूल्यांकन होते. मूल्यांकन माहितीमध्ये अन्न आणि पोषण, ज्ञान, अन्न पद्धती, पौष्टिक स्थिती, सवयी, आहार याबद्दलचा दृष्टिकोन आणि धारणांमध्ये बदल समाविष्ट होता. 72 टक्के देशांनी शाळेच्या परिसरात खाद्यपदार्थ वाटपावर काही मर्यादा आणल्या आहेत. मात्र लठ्ठपणा रोखण्यावर लक्ष दिले जात नाही.