
बांगलादेशात माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर अवघ्या सात महिन्यांत 140 हून अधिक कापड कारखाने बंद पडले आहेत. यामुळे या ठिकाणी एक लाखाहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. अनेक गारमेंट कंपन्यांमध्ये कामगारांना 2 महिने ते 14 महिन्यांपर्यंतचे वेतन देण्यात आले नाही. त्यांची उपासमार होत आहे.
कारखान्यातून वेतन मिळावे यासाठी ते रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहेत. ईदनंतर आणखी कारखाने बंद पडण्याची भीती आहे. सरकार आणि वस्त्राsद्योग मालकांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. देशात आर्थिक मंदी उद्भवल्याने कपडय़ांचे कारखाने बंद पडत आहेत. तसेच देशात राजकीय अस्थिरता असल्याचा फटकासुद्धा उद्योगांना बसत आहे. बंद पडणारे कारखाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगशी संबंधित नेत्यांचे आहेत.