
बंगळुरूमधील एका तरुणाने बेरोजगारीला कंटाळून स्वतःलाच श्रद्धांजली वाहणारी एक पोस्ट लिंक्डइनवर शेअर केली आहे. या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. प्रशांत हरिदास असे या तरुणाचे नाव असून तो गेल्या तीन वर्षांपासून बेरोजगार आहे. नोकरी नसल्याने कर्जबाजारी झालो आहे. नोकरी मिळवण्यासाठी स्वतःवर खूप पैसा खर्च करत बरेच प्रयत्न केले. परंतु तीन वर्षांत अद्याप नोकरी मिळाली नाही. बेरोजगारीला कंटाळून हताश झालेल्या प्रशांतने अखेर लिंक्डइनवर स्वतःच्या फोटोला एक हार घालत श्रद्धांजली वाहिली. या पोस्टला कॅप्शन देताना प्रशांतने लिहिले की, ‘रेस्ट इन पिस. थँक यू लिंक्डइन, थँक यू इंडस्ट्री लीडर्स, माझ्याकडे वारंवार दुर्लक्षित केल्याबद्दल.’