कन्नौज रेल्वे स्थानकावर बांधकामाधीन इमारत कोसळली, 23 जण जखमी; अमृत भारत योजनेंतर्गत सुरू होते काम

उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावरील निर्माणाधीन इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. आज दुपारी इमारतीचे मोठे खांब कोसळल्याने एकच खळबळ माजली. गर्दी, धुळीचे साम्राज्य, किंकाळ्य़ांमुळे प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱयाखाली अडकले असल्याची भीती आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 23 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 20 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर तीन गंभीर आहेत.