सांगलीतील 60 हजार शेतकऱयांना मिळणार दिवसा वीज

कृषी सिंचनासाठी दिवसा वीज मिळावी, या हेतूने राज्य शासनाने महावितरणमार्फत ‘सौर कृषी वाहिनी योजना’ राबविली जात आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. ‘अभियान 2025’ अंतर्गत सांगली जिल्हय़ात 30 उपकेंद्रांच्या ठिकाणी 1142 एकर जमिनीवर 207 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जानिर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारे 60 हजार शेतकऱयांना दिवसा वीज मिळेल. सौर प्रकल्प उभारणीसाठी नियुक्त एजन्सीला जमीन हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

शेतीला दिवसा, अखंडित व शाश्वत वीज देण्यासाठी कृषी क्षेत्राचा वीजभार असणाऱया वीजवाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे. 33/11 केव्ही उपकेंद्रांच्या ठिकाणी 5 ते 10 किलोमीटर परिघातील गायरान, नापीक व पडिक जमिनीवर 0.5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौरप्रकल्प उभारणी करण्यात येणार आहेत. सौरप्रकल्पासाठी शासकीय जमीन नाममात्र एक रुपया या दराने भाडेपट्टा व पोटभाडेपट्टय़ाने उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प कार्यान्वित झाला असेल, त्या ग्रामपंचायतींना 5 लाख प्रोत्साहनात्मक आर्थिक मदत 3 वर्षांसाठी देण्यात येणार आहे.

शेतीला सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. या योजनेमुळे शेतीच्या वीजपुरवठा खर्चात कपात होईल. तसेच अपारंपरिक ऊर्जा खरेदी बंधनाचे उद्दिष्टही साध्य होईल. त्यामुळे क्रॉस सबसिडीचा भार कमी होऊन औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात कपात होईल. सौर प्रकल्पासाठी निवडलेल्या उपकेंद्रांचे बळकटीकरण, त्यात रिले बसविणे, ब्रेकर्स बसविणे, आार्ंथग करणे, बॅटरी व चार्जर व्यवस्था, खडीकरण, रंगरंगोटी आदी कामे प्रगतिपथावर आहेत. याद्वारे 60 हजार कृषी ग्राहकांना सिंचनासाठी दिवसा विजेची सोय होणार आहे.

खानापूर-विटा तालुका ः 33/11 केव्ही उपकेंद्र – खानापूर (सौर प्रकल्प गावाचे नाव – बेनापूर व रेणावी 9 मेगावॅट- 45 एकर), लेंगरे (रेणावी 9 मेगावॅट- 45 एकर), गार्डी (भाग्यनगर-भाकुचीवाडी 5 मेगावॅट- 23.77 एकर), पारे (रेणावी 5 मेगावॅट- 25 एकर), रेणावी (रेणावी 4 मेगावॅट- 20 एकर).

जत तालुका ः संख (आसंगी 6 मेगावॅट- 28 एकर), शेगाव (कोसारी 5 मेगावॅट- 25 एकर), उमदी (हळ्ळी 8 मेगावॅट- 39 एकर), तिकोंडी (कोंत्याव बोबलाद व तिकोंडी 10 मेगावॅट- 70 एकर), पाचापूर (शेडय़ाळ 5 मेगावॅट- 50 एकर), धावडवाडी (बेवनूर व बिरनाळ 10 मेगावॅट- 55 एकर), जिरग्याळ (जिरग्याळ 4 मेगावॅट- 17 एकर), बसर्गी (बसर्गी 4 मेगावॅट- 16 एकर), उटगी (बेलोंडगी 5 मेगावॅट- 40 एकर), बोरगी (मोरबगी 10 मेगावॅट- 55 एकर), सोन्याळ (माडग्याळ 5 मेगावॅट- 35 एकर.

तासगाव तालुका ः सावळज (खुजगाव 6 मेगावॅट- 30 एकर), मणेराजुरी (गवाण 10 मेगावॅट- 55 एकर), बोरगाव (मणेराजुरी 9 मेगावॅट- 50 एकर), वायफळे (मोरळेपेड 5 मेगावॅट- 21 एकर), कौलगे (खुजगाव 9 मेगावॅट- 45 एकर), मांजर्डे (गौरगाव 5 मेगावॅट- 37 एकर), आटपाडी तालुकाः खरसुंडी (घाणंद 8 मेगावॅट- 38 एकर), लिंगीवरे (पळसखेल व लिंगीवरे 10 मेगावॅट- 47 एकर), पुजारवाडी (पळसखेल 9 मेगावॅट- 45 एकर), माडगुळे (माडगुले 5 मेगावॅट- 20 एकर), कवठेमहांकाळ तालुकाः करोली (कोगनोळी 9 मेगावॅट- 42 एकर), केरेवाडी (केरेवाडी 5 मेगावॅट- 35 एकर), कडेगाव तालुकाः वांगी (तडसर 8 मेगावॅट- 66 एकर), शिरसगाव (शिरसगाव 5 मेगावॅट- 22 एकर) उपकेंद्रे व गावांचा योजनेत समावेश आहे.

वीज खरेदी-विक्रीचा करारही पूर्ण

n ‘सौर कृषी वाहिनी योजने’साठी खुल्या निविदेमार्फत दर आधारित बोलीद्वारे विकसकांबरोबर वीज खरेदी करारनामा व महावितरण कंपनीसोबत वीजविक्री करारनामा करून प्रकल्प उभारण्यात येत आहेत. प्रकल्प जमीन व परवानगीसाठी विशेष हेतू वाहनव्यवस्था करण्यात आल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी सांगितले.

n सौर वीजनिर्मिती करणाऱया उपकेंद्रांची संख्या (तालुका, उपकेंद्र संख्या)ः खानापूर 5, जत 11, तासगाव 6, आटपाडी 4, कवठेमहांकाळ 2, कडेगाव 2.