पदार्पणाच्या सामन्यात वैष्णवी शर्माची चमकदार कामगिरी, मलेशियाविरुद्धच्या सामन्यात रचला इतिहास

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने आपल्या पदार्पणातच मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने मंगळवारी मलेशियावर विजय मिळवला आहे. वैष्णवीने आपल्या पदार्पणातच मलेशियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 16 व्या सामन्यात तुफान गोलंदाजी करताना 5 विकेट्सची हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला. अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रिक घेणारी वैष्णवी पहिली हिंदुस्थानी गोलंदाज ठरली आहे.

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत टीम इंडियाने दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात 9 विकेट्सने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. आता दुसऱ्या सामन्याने संघाने 17 बॉलमध्ये मलेशियाला ऑल आऊट करून दुसरा विजय मिळवला आहे. या विजयामुळे ग्रुप स्टेजच्या यादीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे.

सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आणि फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2025 चा 16 व्या सामन्यात हिंदुस्थानी संघाने मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला. हिंदुस्थानच्या विजयात वैष्णवी शर्माने मोठे योगदान दिले आणि तिला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. वैष्णवी शर्माने शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या आणि मलेशियाला 31 धावांवर रोखण्यात मदत केली. हिंदुस्थानने अवघ्या 2.5 षटकांत लक्ष्य गाठले.