दापोलीत योगेश कदम यांच्याविरोधात त्यांचे काका सदानंद ऊर्फ अप्पा कदम हे निवडणूक प्रचारात उतरले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता एकतर्फी होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांचे निवडणूकीतील विजयाचे पारडे जड झाले आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकुण 9 उमेदवार आहेत. मात्र, मुखअय लढत शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि मिंधे गटाचे योगेश कदम या महायुतीच्या उमेदवारांमध्येच होणार आहे. रामदास कदम यांचे सख्खे भाऊ आणि योगेश कदम यांचे काका प्रगतीशील शेतकरी सदानंद ऊर्फ अप्पा कदम पुतण्या विरोधात निवडणूक प्रचारात उतरल्याने दापोली विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतील महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे.
एक प्रगतशील शेतकरी असलेल्या उद्योजक सदानंद ऊर्फ अप्पा कदम यांना मानणारा दापोली विधानसभा मतदार संघातील खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये मोठा चाहतावर्ग आहे. अशा या सदानंद कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचाराला दापोली तालुक्यातून सुरूवात केली. यावेळी मतदारांचा त्यांना ठिकठिकाणी प्रचारादरम्यान मिळत असलेल्या उस्फूर्त प्रतिसादाने सदानंद ऊर्फ अप्पा कदम भावुक झाले. निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ करताना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सदानंद ऊर्फ अप्पा कदम यांचा कंठ दाटून आला. अनेक संकटाचा सामना करून कणखरपणे उभे असलेल्या प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक सदानंद कदम यांनी दापोली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या निवडणूक प्रचाराला दणक्यात सुरुवात केली.
महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांनी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांना झालेल्या सर्व प्रकारच्या त्रासाबाबत कार्यकर्त्यांशी बोलताना सदानंद उर्फ आप्पा कदम यांचा अक्षरशः कंठ दाटून आला त्यांच्यावरती झालेल्या आजपर्यंतच्या अन्याबाबत बोलताना ते भावूक झाले. संजय कदमच आमदार का हवेत याबाबत बोलताना सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी आपण आपल्याच कुटुंबीयांच्या विरोधात का लढत असल्याचे पदाधिकाऱ्यांना सांगितले. जमलेल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी मार्गदर्शन करत दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार संजय कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला.
दापोली येथील निवडणूक प्रचाराच्या शुभारंभाला शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर , तालूका सचिव नरेंद्र करमरकर , खेड तालुक्यातील काँग्रेसचे तालूका अध्यक्ष गौस खतीब, माजी बांधकाम समिती सभापती विश्वास कदम , रमेश पांगत आदींसह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.