
उन्हाळा सुरु झाल्यावर त्वचेच्या अनेक समस्या या डोकं वर काढू लागतात. उन्हाळ्यात जास्त घामामुळे त्वचेवर टॅनिंग वाढू लागते. त्यामुळे मुरुमांची संख्याही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये वाढते. त्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्यांकडे उन्हाळ्यात अधिक दक्ष राहावे लागते. उन्हाळ्यात सुती कपड्यांना आपण अधिक प्राधान्य देतो. परंतु स्लीव्हलेस ड्रेस मात्र काखेतील काळेपणामुळे घालता येत नाहीत. अशावेळी काही घरगुती उपायांनी आपल्या काखेतील काळेपणावर मात करु शकतो. अगदी सोपे आणि खिसाही जपणारे हे उपाय आहेत.
काखेतील काळेपणावर घरगुती उपाय
तुमच्या काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी, बटाटा हा सर्वात महत्त्वाचा आहे. आपण बटाट्याचा रस काढून काखेत लावू शकतो. फक्त योग्य पद्धत वापरून आपण हा उपाय करायला हवा.
यासाठी काय करावं लागेल
यासाठी तुम्हाला एक बटाटा घ्यावा लागेल. बटाटा किसून घ्या, त्यानंतर त्याचा रस पिळून काढा. त्यात थोडेसे अॅलोवेरा जेल घालावे. हा रस काखेत लावावा, किमान 15 मिनिटे हा रस चोळून लावून तसाच ठेवावा. त्यानंतर काख स्वच्छ धुवून घ्यावी.
नारळ तेल आणि लिंबू
काखेतीरल काळेपणा घालवण्यासाठी नारळ तेल आणि लिंबू हा देखील उत्तम पर्याय मानला जातो. लिंबामध्ये सायट्रिक आम्ल जास्त असते त्यामुळे त्वचेला उजळपणा येण्यास मदत होते. तसेच नारळ तेलही त्वचेसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.
एका भांड्यात 2 चमचे खोबरेल तेल घ्यावे लागेल. त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळावा, नंतर ते कापसाच्या मदतीने लावावे. काही वेळ हे सुकू द्यावे. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करावे. या उपायाने काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होईल.
काखेत कधीही ब्लीच लावू नका, ब्लीचमुळे त्वचा जळण्याचा जास्त संभव असतो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)