
जम्मू-कश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा निंदनीय दहशतवादी कृत्यांच्या आयोजकांना व प्रायोजकांना न्यायालयासमोर खेचूनच आणले पाहिजे, असा सज्जड दमच परिषदेने दिला आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शोधून काढायला हवे. यासाठी सर्व राष्ट्रांनी व त्यांच्या तपास यंत्रणांनी एकत्र येऊन सर्वोत्तोपरी मदत करायला हवी, असे आवाहनही परिषदेने केले आहे.