मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस सूर्यकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यातील झेंडय़ाची वाडी आणि उंबरवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मागणीनुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना टॅब, प्रिंटर, वह्या, दप्तरे, औषधे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच वयोवृद्धांना सांधेदुखीवरील तेल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक उपक्रमाला समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, नीळकंठ जाधव, उपाध्यक्ष संजय तावडे, चिटणीस सुहास बाबर, गणेश भगत, राजेश म्हात्रे, प्रमोद मासावकर, महेंद्र पारकर, कुणाल कांदळगावकर, प्रवीण ब्रीद, सहदेव पोसम, सुनील केळकर, शाम चवरकर, इसाक शेख, विलास कांबळे, मानस, पारस या सर्वांनी हातभार लावला.