अल्टीमेट युटीटी टेबल टेनीस 2024 या स्पर्धेचा आगामी हंगाम 22 ऑगस्टे ते 7 सप्टेंबर 2024 या कालावधीत चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच 8 संघ या हंगामात एकमेकांना भिडणार आहेत. नुकतीच या हंगामाची प्लेअर ड्राफ्ट प्रक्रिया पार पडली असून 16 परदेशी खेळाडूंसह एकूण 48 खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (TTFI) संयुक्त विद्यमाने नीरज बजाज आणि विटा दाणी यांनी मिळून फ्रँचायझी आधारित लीग जगासमोर आणली. 2024 च्या या हंगामात पहिल्यांदाच आठ संघ खेळताना दिसणार आहेत. 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत रंगणाऱ्या या स्पर्धेची ड्राफ्ट प्रक्रीया नुकतीच पार पडली. युटीटी लीगच्या या हंगमात पुणेरी पलटन, यु मुंबा, पीबीजी बंगळुरू, गोवा चॅलेंजर्स , चैन्नई लायन्स, दबंग दिल्ली या संघांव्यतिरिक्त जयपूर पॅट्रिओट्स आणि अहमदाबाद एसजी पायपर्स हे दोन संघ पहिल्यांदाच या हंगामात खेळताना दिसणार आहेत. या हंगामात पदार्पण करणाऱ्या जयपूर पॅट्रिओट्सने हिंदुस्थानची स्टार खेळाडू श्रीजा अकुला हिचा आपल्या ताफ्यात समावेश केला. युटीटी पदार्पण करणारी दुसरी फ्रँचायझी अहमदाबाद एसजी पायपर्स यांनी मानुष शाहला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. तसेच इतर सहा संघांनी सुद्धा आपापल्या संघांमद्ये खेळाडूंचा भरणा केला. ड्राफ्ट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फ्रँचायझींनी त्यांच्या सहा सदस्यीय संघांना अंतिम रूप दिल्याने 16 परदेशी खेळाडूंसह एकूण 48 खेळाडू या लीगमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. युटीटी लीगचा आगामी हंगाम Sports 18 या चॅनलवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तसेच Jio Cinema वर सुद्धा लीग पाहता येणार आहे.