रशियाचा युक्रेनच्या अणुभट्टीवर ड्रोन हल्ला!

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाने दहशतवादी कृत्य केले. जगाला अतिशय घातक किरणोत्सर्गापासून वाचवणाऱया इमारतीवर शक्तिशाली बॉम्बने हल्ला करण्यात आला, असे सांगताना झेलेन्स्की यांनी या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचे धोकादायक परिणाम नमूद केले.