रशियावर 9/11 सारखा हल्ला; स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने 3 गगनचुंबी इमारतींना उडवले

रशियातील कझान शहरावर भीषण हल्ला झाला आहे. शहरातील तीन गगनचुंबी इमारतींवर स्फोटकांनी भरलेले ड्रोन धडकले. यामुळे इमारतींचे प्रचंड नुकसान झाले असून अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र या हल्ल्यामुळे अमेरिकेवर झालेल्या 9/11 हल्ल्याची सर्वांना आठवण झाली. हा हल्ला युक्रेनने घडवून आणल्याचा थेट आरोप रशियाने केला असून कझान विमानतळ बंद केल्याचे वृत्त आहे.

कझानमझील गगनचुंबी इमारतींवर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात वेगवेगळ्या दिशांनी आलेले ड्रोन इमारतींवर धडकत असल्याचे स्पष्ट दिसते. ड्रोनची धडक होताच मोठा स्फोट होतो आणि इमारतीला आग लागते. यानंतर संपूर्ण इमारत मोकळी करण्यात येते.