रशियाची राजधानी मॉस्कोवर युव्रेनने सर्वात मोठा हल्ला केला आहे. 2022 मध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. 34 ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे मॉस्कोत कुठल्याही प्रकारची वित्तहानी झालेली नाही, परंतु तीन मोठय़ा विमानतळांवरील अनेक विमाने इतरत्र वळवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, यात एक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे हा हल्ला कुचकामी करण्यात आला असून सर्व ड्रोन पाडण्यात आल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
युव्रेनने केलेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असून त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशाराही रशियाने दिला आहे. युव्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने रशियाच्या रासायनिक प्रकल्पावरही हल्ला केला. शुक्रवारी रात्री उशिरा रशियाच्या पश्चिमेकडील शहर तुला येथील एका रासायनिक प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 13 ड्रोनचा वापर करण्यात आला. या प्रकल्पात रशियन सैन्यासाठी बॉम्ब, शस्त्र तयार करण्यात येत असल्याचा दावा युव्रेनच्या स्पेशल ऑपरेशन पर्ह्सने केला आहे. दरम्यान, या हल्ल्यात अलेक्सिंस्काया थर्मल पावर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून 110 केव्ही विज ट्रान्समिशन लाइन उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. हा प्रकल्प मॉस्कोपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे.