महिला तुरुंग अधिकारी कैद्यासोबत तुरुंगातच सेक्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिंडा डे सोसा अब्य्रु असे त्या महिला अधिकारीचे नाव असून ती लंडनधील एचएमपी वाँडसवर्थ तुरुंगाची तुरुंग अधिकारी होती.
लिंडा हिने ड्युटीवर असताना एका कैद्यासोबत सेक्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. ड्युटीवर असताना कामाच्या ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी लिंडा हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारी तिला युक्सब्रिज न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
लिंडाचा व्हिडीओ सर्व सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने या तुरुंगाची नाचक्की झाली आहे. आधीच या तुरुंगात भ्रष्टाचार, हिंसाचारासारखे प्रकार झाल्याचे समोर आल्याने प्रशासनावर टीका होत होती. त्यात आता लिंडाचा व्हिडीओ समोर आल्याने अधिक टीका होत आहे.