
जम्मू आणि कश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात लपलेल्या दहशतवाद्यांची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर त्यांनी या भागाला घेरले. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यात एक जवान शहीद झाला. त्यानंतर चकमक सुरू झाली, अशी माहिती लष्कराने दिली आहे.
लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सच्या मते, चकमकीत सैनिक गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर उपचार करण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, उधमपूरच्या बसंतगडमध्ये आज जम्मू आणि कश्मीर पोलिसांसोबत लष्कराकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला घेरल्यानंतर बिथरलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात एक जवान जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. लष्कराचे ऑपरेशन्स सुरूच आहेत’, असे लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने X वर सांगितले.