
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन केले.
आज भारतीय कामगार सेनेची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे पार पडली. कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढत असताना, त्यांचं हित प्रथम ध्येय ठेवून इतकी वर्ष अविरत काम करणे कौतुकास्पद आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपली शिवसेना महाराष्ट्रहितासाठी सदैव झटत आलीय आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून काम करणाऱ्या कामगारांची फळी भविष्यात तयार झाली पाहिजे, असा आशावाद यावेळी व्यक्त करत; भारतीय कामगार सेनेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.