महाराष्ट्रात बुधवारी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे देखील त्यांच्या सोबत होत्या.
उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना विनोद तावडे यांच्या पैसे वाटपाबाबत विचारले. त्यावर प्रतिक्रीया देताना उद्धव ठाकरे यांनी ”ही सगळी भ्रष्ट्र आणि दहशतवादी राजवट खतम करून टाक असे साकडे मी आज आई तुळजाभवानीला घातले आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची सोमवारी सांगता झाली असून महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात मतदानाची पूर्वतयारी सुरू आहे.